Pawar, Thackeray आणि Shelar यांच्या Mumbai Cricket Association मध्ये सावळागोंधळ : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ही सारी मंडळी आपापली राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकोप्यानं नांदतात ते व्यासपीठ आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं. पण कोरोनाच्या संकटकाळात त्या चौघांचंही त्याच एमसीएकडे असं काही दुर्लक्ष झालंय की, तिथं सध्या सावळागोंधळ सुरु आहे. कधीही कोणीही लहानथोर क्रिकेटर येतो आणि आपल्या लाडक्या लेकाला थेट मुंबईच्या संघातून खेळवतो. कधी कार्यकारिणीचे पदाधिकारीच सचिवांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप घेतात. आणि आता तर मुंबईच्या निवड समितीचे सदस्य आनंद याल्विगी यांनी एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांना ई-मेल पाठवून कार्यकारिणी सदस्य किरण पोवार यांची तक्रार केली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी आपल्या क्लबमधल्या खेळाडूंची संघात निवड करण्यासाठी पोवार यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप याल्विगी यांनी केला आहे. पोवार यांनी केलेला असंसदीय शब्दांचा वापर आणि त्यांचा सूर कानाला खटकणारा होता, असंही याल्विगी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आपण सांगितलेल्या खेळाडूची निवड झाली नाही, तर त्याचा परिणाम साऱ्या निवड समितीला भोगायला लागेल अशी धमकी एका माजी रणजीपटूनं देण्याची घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचंही याल्विगी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील काय निर्णय घेतात, याकडे मुंबईकर क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram