Mumbai Covid Count: मुंबईत आज 11 हजार 317 नवे कोरोनाबाधित ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत प्रचंड प्रमाणात सापडणारे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. आज (शुक्रवारी) सापडलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचेही समोर आले आहे. मागील 24 तासांत 11 हजार 318 नवे कोरोनाबाधित सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. पण रुग्णसंख्या 10 हजारांहून अधिक असल्याने धोका कायम आहे. ज्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram