Corona Vaccine | दुसरा डोस घेण्याआधीच दाम्पत्याला लस घेतल्याचं प्रमाणपत्र, मुंबईतील प्रकार
एकीकडे लसीकरण करा म्हणून सरकार लोकांना आवाहन करतं आहे मात्र दुसरीकडे लसीकरण कार्यक्रमातील सावळा गोंधळ समोर आला आहे. कारण, लस न घेताच लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. घाटकोपरमधल्या नाईक दाम्पत्याने लसीचा पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस घेण्याआधीच त्यांना दोन्ही डोस पूर्ण झाले म्हणून अभिनंदनाचा मेसेज आला आणि मिळालं प्रमाणपत्र.