Mumbai Corona Update : मुंबईत आज दिवसभरात 19,474 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Mumbai Coronavirus Updates: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत.