
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना लस घेतलेल्या 23 हजार रुग्णांना कोरोना संसर्ग
Continues below advertisement
मुंबईत गणेशोत्सवाचे आफ्टर इफेक्ट दिसू लागले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या 147 ने वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 514 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
Continues below advertisement