Mumbai Corona Count: मुंबईतल्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नसून मागील दोन दिवस काहीशी आटोक्यात येणारी रुग्णसंख्या आज पुन्हा वाढली आहे. मागील 24 तासांत आजही 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. या कोरोनारुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram