Dadasaheb Bhuse on Farmers : अहवाल येताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविली जाणार
विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्त भागात त्वरित पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. कृषी मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. तर अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलंय..