काँग्रेसने मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी धर्म पाळला, शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच राहणार आहेत. काँग्रेसने महाविकासआघाडी धर्म पाळत शिक्षण समिती निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहिलं आहे. मात्र काँग्रेसच्या निर्णयामुळे भाजपचे मनसुबे फोल ठरले आहेत.