COVID-19 Vaccine | जुलै 2021 पर्यंत देशातील 25 कोटी लोकांना लस: केंद्रीय मंत्री आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

Continues below advertisement
देशात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनावर लसीच्या संदर्भात महत्वाची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, सरकारकडून जुलै 2021 पर्यंत देशातील 25 कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते. आज संडे संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की,  2021 च्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.  सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असं अनुमान आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram