Mumbai Coastal Road : येत्या महिन्याभरात कोस्टल रोड खुला होणार, Iqbal Singh Chahal यांच्याशी बातचित
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Coastal Road : येत्या महिन्याभरात कोस्टल रोड खुला होणार, Iqbal Singh Chahal यांच्याशी बातचित
मुंबईचा सागरी किनारा मार्ग म्हणजे कोस्टल रोड येत्या महिन्याभरात खुला होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि साहजिकच अवघ्या मुंबईकरांच्या मनात सागरी किनारा मार्गाविषयी कुतूहल दाटून आलं. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही मुंबई महापालिका प्रशासक आणि आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून घेतलीयत. सागरी किनारा मार्गाच्या वरळी ते मंत्रालय या पहिल्या टप्प्यातल्या चार मार्गिकांचा मुंबई महापालिका ३१ जानेवारीला ताबा घेणार आहे. त्यानंतर १० दिवस या मार्गिकांवर ट्रायल रन होईल आणि दहा फेब्रुवारीनंतर या चार मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. पाहूयात आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं महापालिका आयुक्तांशी साधलेला संवाद.