CM Uddhav Thackeray | 3 मे नंतर झोननुसार मोकळीक देणार : मुख्यमंत्री
3 तारखेनंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत. पण घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने आपण पावलं टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.