Coronavirus | मालेगावमध्ये SRPF जवान, पोलिसांना कोरोना; ग्रामीण एसपी आरती सिंह यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
मालेगांव सारख्या हॉटस्पॉटमध्ये कर्तव्य बजवणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झल्यान खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 24 एसआरपीएफ जवान आणि 18 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलीस दल धास्तावलं आहे. एकीकडे गर्दी नियंत्रणात आणायची आणि दुसरीकडे पोलिसांनाच क्वॉरन्टाईन करावे लागत असल्याने पोलीस दल कमी पडत आहे. अशा दुहेरी संकटात सध्या नाशिक ग्रामीण पोलीस आहेत, सध्या 1700 पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना अतिरिक्त कुमक मागवली जात आहे. ज्या पोलिसांना बाधा झालीय त्यांचे जवळचे सहकारी आणि कुटुंबियांना देखील क्वॉरन्टाईन केलं जातं आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह गेल्या 8 ते 10 दिवसापासून मालेगावमध्ये ठाण मांडून आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement