Shiv Sena Meeting | मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर शिवसेनेच्या संपर्कप्रमुख, उपनेत्यांची बैठक बोलावली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर संपर्कप्रमुख आणि उपनेत्यांची बैठक बोलावली आहे. ग्रामपंचायत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर भगवा फडकवण्याचे आदेश सैनिकांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना मंत्री आणि जिल्हाप्रमुखांचीही बैठक पार पडली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय आदेश देणार? स्थानिक निवडणुका एकत्र लढणार की वेगवेगळ्या? याची उत्सुकता आहे.