Kolhapur | कोल्हापुरातील खाजगी सावकार सरकारच्या रडारवर; जिल्ह्यातील 9 सावकारांवर छापेमारी
कोल्हापुरात खाजगी सावकार हे सरकारच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 9 सावकारांवर छापेमारी करण्यात आलेली आहे. छापेमारीत काही कागदपत्र आणि कोरे धनादेश जप्त करण्यात आले असून सहकार विभागाने ही कारवाई केली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपूर, हरोली, धरणगुती, तारदाळ, खोतवाडी भागांत मोठी कारवाी करण्यात आली आहे.