Mumbai Chunabhatti Firing News : मुंबईतील चुनाभट्टीत Pappu Yerunkar स्थानिक गुंडावर गोळीबार
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 06:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Chunabhatti Firing News : मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकरवर (Pappu Yerunkar) गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंतर्गत वादातून पप्पू येरुणकरवर हा गोळीबार करण्यात आला आहे. त्याच्यासोबत इतर चार लोकांवरही गोळीबार करण्यात आला. जखमींना सध्या सायन रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. चुनाभट्टीतील आझाद गल्ली परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी 16 राऊंड फायर करण्यात आले आहेत. येरुणकर सोबत इतर तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. या गजबजलेल्या परिसरात सध्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.