Mumbai : भावाल घरात घेतलं नाही म्हणून आई वडिलांकडून स्वत:च्या मुलीला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Continues below advertisement

चेंबूर  येथील लाल डोंगर परिसरात भावाला घरात घेण्यास विसरली म्हणून आई वडिलांनी पंधरा वर्षीय मुलीला बेदम मारहाण केल्याने आई आणि वडीलाला पोलिसांनी अटक केली आहे. चेंबूरच्या अल्टाविस्ता इमारतीमध्ये हे कुटुंब रहाते.मारहाण झालेल्या पंधरा वर्षीय मुलीच्या भावाला आईने घरात घेण्यास सांगितले होते. मात्र ही मुलगी पिण्याचे पाणी भरण्यात आणि मग अभ्यास करण्यात व्यस्त झाली आणि भावाला घरात घेण्यास विसरली. आई वडील घरी आल्यावर त्यांना हे कळताच त्यांनी या मुलीला बेदम मारहाण केली. वडिलांनी तिला पट्ट्याने मारहाण करीत दोन वेळा उचलून जमिनीवर आपटले. ही घटना घरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि हा सीसीटीव्ही व्हायरल झाला. याची माहिती चुनाभट्टी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ या कुटुंबाचा शोध घेऊन आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.पुढील तपास चूनाभट्टी पोलीस करीत आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram