राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून 2 नावं चर्चेत
नवी दिल्ली : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून कुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तर 4 ऑक्टोबरला या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या जागेसाठी काँग्रेस नेते मुकुल वासनिक हे सध्या सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून संघटनेचं काम ते पाहत आहेत. शिवाय सोनिया गांधींच्या कोअर टीममधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.