Chandivali Fire |मुंबईत चांदिवलीतल्या स्टुडिओला आग,प्रसिद्ध मालिकांचं चित्रीकरण सुरू असल्याची माहिती
मुंबईतल्या साकीविहार चांदीवली येथील स्टुडियोमध्ये भीषण आग लागली होती. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. या स्टुडियो मध्ये विविध प्रसिद्ध मालिकांचे शूटिंग आग लागल्यावेळी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. क्लिक निक्सन नामक हा स्टुडिओ आहे. या आगीत काही कामगार किंवा कलाकार अडकल्याची भीती ही व्यक्त केली जात आहे.