Mumbai : मुंबईत साखळी स्फोट घडवण्याचा कट होता, पंजाबच्या पोलीस महासंचालकांची माहिती
मुंबईत साखळी स्फोट घडवून अस्थिरता माजवण्याचं षडयंत्र पुन्हा एकदा समोर आलंय. पाकिस्तानात हा कट शिजत असल्याची माहिती पंजाबमधल्या लुधियाना कोर्टात झालेल्या स्फोटाच्या तपासात समोर आलीय. पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात लुधियाना स्फोटाचं आयएसआय कनेक्शनही उघड झालंय. त्यातच मुंबईसह दिल्लीत साखळी स्फोट घडवण्याचा कटही समोर आलाय. पंजाबचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिलीय.