Mumbai: दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सोहळा, पद्म पुरस्कारानिमित्त वाडकरांना स्वरवंदना ABP Majha

Continues below advertisement

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याच्या निमित्तानं अटल सेवा केंद्र या संस्थेच्या वतीनं त्यांचा विलेपार्ल्यात अनोख्या पद्धतीनं सन्मान करण्यात आला. विलेपार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते वाडकरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. राजीव खांडेकर यांच्यासह ज्येष्ठ गायक-संगीतकार श्रीधर फडके, ज्येष्ठ गायिका साधना सरगम आणि भाजप आमदार पराग अळवणी यांची सुरेश वाडकर यांच्या गौरवपर भाषणंही झाली. पण स्वरनभीचा ध्रुव या कार्यक्रमातून वाडकरांना देण्यात आलेली स्वरवंदना या सोहळ्याचा उत्कर्षबिंदू ठरली. सुरेश वाडकर यांनीही या सोहळ्यात आपली काही गाणी सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram