Mumbai : राणी बागेत झालं नव्या पाहुण्यांचं बारसं,  वीरा आणि ऑस्कर बागेतले नवे सदस्य

Continues below advertisement

राणीच्या बागेतल्या दोन नव्या पाहुण्यांचं आज बारसं झालंय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी नव्या वाघाच्या मादी बछड्याचं नाव वीरा आणि नव्या नर पेंग्विन पिल्लाचं नाव ऑस्कर असं ठेवलंय. 18 ऑगस्ट 2021 मध्ये मोल्ट आणि क्लिपर या पेंग्विन जोडीला दुसरं पिल्लू झालं तर औरंगाबादमधून आणलेल्या शक्ती आणि करिश्मा या बंगाली वाघांच्या जोडीनं मादी बछड्याला जन्म दिलाय. यावरून टीका करणाऱ्यांनाही महापौरांनी यावेळी सुनावलं. प्राण्यांचंही कुटंब आहे आणि त्यांच्या आंनंदाचाही जल्लोष झाला पाहिजे अशा शब्दात महापौरांनी टीकाकारांना उत्तर दिलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram