Mumbai Bus Fire | मुंबईतील वडाळ्यात खासगी बसला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Continues below advertisement
मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्त्यावर पार्किंग केलेल्या एका खाजगी बसला रात्री भीषण आग लागली. बस पार्किंगमध्ये उभी असल्याने आग लागली तेव्हा त्यात कोणी ही नव्हते. रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान ही आग लागली आणि काही क्षणात आगीत संपूर्ण बस भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच त्वरित अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीत जीवितहानी झाली नसली तरी पूर्ण बस आगीत जळून खाक झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram