SSC Exam | रात्री वडिलांचं निधन, सकाळी दहावीचा पेपर; दहावीच्या विद्यार्थ्याचा धीरोदात्तपणा

Continues below advertisement
मुंबईतल्या चेंबूरमध्ये वडिलांच्या निधनानंतर धीरोदात्तपणे दहावीचा बोर्डाचा पेपर देणारा संदेश साळवे हा चर्चेचा विषय ठरला आहे. टिळकनगरातल्या पंचशील नगरमध्ये राहत असलेल्या परमेश्वर साळवे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय साळवे कुटुंबातल्या वडीलधाऱ्या माणसांनी घेतला होता. पण संदेशने आपल्या वडीलधाऱ्यांना समजावून सांगितलं की, तो सकाळी दहावीच्या परिक्षेचा पहिला पेपर देऊन येईन. साळवे कुटुबियांना संदेशचा मुद्दा पटला. त्यामुळे संदेश पहिला पेपर देऊन घरी आल्यावरच त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram