Mumbai Lightning : मुंबईमधील झाडांवरील रोषणाई सात दिवसांत हटवा - बीएमसी
Mumbai Lightning : मुंबईमधील झाडांवरील रोषणाई सात दिवसांत हटवा - बीएमसी मुंबईमधील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई सात दिवसात हटवावी, असे लेखी आदेश महापालिका प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. तसंच जोपर्यंत रोषणाई हटवली जात नाही तोपर्यंत दिवे बंद ठेवावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व झाडांवरील रोषणाई २३ एप्रिलपर्यंत हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झाडांवरील रोषणाईवरुन मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारलं होतं. त्यानंतर महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी सोमवारपासून आपापल्या हद्दीतील झाडांच्या खोडांवरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरुवात केलीय.