Navneet and Ravi Rana | राणा दाम्पत्याचं मुंबईतील घराला मुंबई महापालिकेची नोटीस ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या निर्धार करून आलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा गेल्या दहा दिवसांपासून जेलमध्ये मुक्कामी आहे. आता राणा दाम्पत्यांना मुंबई महापालिकेनं दणका दिला आहे. रवी राणा यांच्या मुंबईत खार इथल्या घरात अवैध बांधकाम झाल्याचा आरोप करत नोटीस बजावण्यात आलीय. मुंबई महापालिकेचं पथक उद्या या बंगल्यावर उद्या पाहणी करणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झालीय. याआधी पालिकेनं नारायण राणे, मोहित कंबोज यांच्या बंगल्यातील अवैध बांधकामांवरुन नोटीस बजावली होती.
Continues below advertisement