Pune :  अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात  11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

Pune :  अक्षयतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना  11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. हे आंबे उद्यापासून मधील रुग्ण,अनाथाश्रम,वृद्ध आश्रम ,दिव्यांग  आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे .
आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola