Brihanmumbai Municipal Corporation : खोट्या कागदपत्रांवर BMC मध्ये नोकरी, 28 वर्षानंतर प्रकार उघडकीस
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखोट्या कागदपत्रांवर महानगरपालिकेमध्ये गेल्या 28 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात जुलै महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. बीएमसीतील दुसर्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर काम करणाऱ्या बीएमसी कर्मचार्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ही कागदपत्रे ज्या व्यक्तीची होती ती व्यक्ती देखील बीएमसीमध्ये कार्यरत आहे. दोन्ही कर्मचार्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि वाढदिवस हे हुबेहूब एकसारखेच आहे. जेव्हा बीएमसीने सत्यता तपासण्यासाठी या दोघांकडून कास्ट सर्टिफिकेटची मागणी केली तेव्हा दुसर्या व्यक्तीचे कागदपत्र वापरुन हे काम करणार्या कर्मचार्याने कामावर येण्यास थांबविले.