Mumbai Plastic Ban : मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी,50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 09:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्यापासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद, ग्राहकांना इशारा तर दुकानदार, फेरीवाले, मॉलवर कारवाई
पर्यावरण रक्षणासाठी पालिका सोमवार, 21 ऑगस्टपासून प्लॅस्टिक पिशवीबंदीची धडक कारवाई सुरू करणार आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱयासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी आणि पालिकेच्या तीन अधिकाऱयांचा समावेश असलेल्या भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार आहे.
कारवाईदरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पाच हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली.