BMC Ban on firecrackers | केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खासगी क्षेत्रात सौम्य फटाक्यांना परवानगी

Continues below advertisement

'प्रकाशाचा आणि आनंदाचा सण' अशी ओळख असणारी 'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घातली आहे. लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला बंदी असेल. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा -1897 अंतर्गत कारवाई केली जाईल, असं महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

'कोविड-19' च्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचं असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकरांना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके म्हणजेच फूलबाजी, अनार, भुईचक्र यांसारखे फटाके फोडता येणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram