ST Employees | एसटी कामगारांचं आज 'आक्रोश' आंदोलन; 3 महिन्यांचं थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी
मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता आक्रोश आंदोलनाला सुरुवात केली आहे. कुटुंब चालवताना अन्न, वस्त्र, निवारा या गरजा देखील पूर्ण करता येत नाही त्यामुळे आम्ही आता जगावं की मरावं तसेच लहान मुलांना आता काय उत्तरं द्यावीत असे अनेक प्रश आमच्या समोर असल्याच्या प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत. राज्यात 1 लाख 10 हजार एसटी कर्मचारी काम करतायत त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पगार अद्याप मिळालेले नाहीत.