मुंबईत 2008 सालच्या बॅचला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 400 हून अधिक पोलीस बांधवांचे रक्तदान
Continues below advertisement
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या एका घोषवाक्यावर हे पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असतात. मात्र, आज या पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑफ ड्युटी सुद्धा समाजाप्रती आपलं कर्तव्य बजावले आहे. 2008 साली भरती झालेल्या बॅचला आज 11 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त या बॅचने सामाजिक बांधिलकी जपत रक्तादान केले आहे. या उपक्रमात 400 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तादान केले. कोरोना संसर्गामुळे सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बॅचचं सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यावेळी काही पोलीस कुटुंबातील सदस्यांनीही रक्तदान केलंय.
Continues below advertisement