Mumbai Gas Leak | मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी
Continues below advertisement
मुंबईच्या पूर्व उपनगरात काल रात्री मोठ्या प्रमाणत गॅसची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात तक्रारी अग्निशमन दलाला आल्या होत्या. अनेकांनी समाज माध्यमातून देखील वायू गळतीची शक्यता वर्तवली होती. या अनुषंगानं अग्निशमन दलाने रात्रभर याचा विविध ठिकाणी शोध घेतला.त्याच बरोबर दक्षता म्हणून ज्या ठिकाणावरून तक्रारी आल्या होत्या तिथे जाऊन दक्षतेबाबत घोषणा करण्यात आल्या. गोवंडी मधील एका औषध कंपनी मधून हा गॅस लिकेज झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली होती. तशी लेखी तक्रार ही केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इथे देखील जाऊन रात्री पाहणी केली. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आणि घाबरुन न जाण्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement