HSC Exam | मुंबईत बारावीच्या दृष्टिहीन विद्यार्थ्याने बोलक्या कम्प्युटरवर परीक्षा दिली
Continues below advertisement
राज्यात बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यात आज बोर्डाच्या इतिहासात पहिल्यादा एका दिव्यांग विद्यार्थ्याने कंप्युटरवर बारावी परीक्षेचा पेपर सोडवला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला दिव्यांग विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्या जातात. आतापर्यंत दहावी बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी आपल्यासोबत पेपर लिहिलण्यासाठी रायटर ठेवले जायचे मात्र आता काळानुरुप यामध्ये तंत्रज्ञान वापरुन परीक्षा कम्प्युटरद्वारे देण्यात यावी, यासाठी बोर्डाच्या मुंबई विभागाने ही सोय विद्यार्थ्याला करुन दिली आहे. कांदिवलीच्या टी. पी. भाटिया ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या भाव्य शहा या दृष्टिहीन विद्यार्थ्याला कम्प्युटरच्या माध्यमातून परीक्षा देण्यास मुभा मिळावी, अशी मागणी कॉलेजने केली होती. ती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागातर्फे मान्य करण्यात आली. त्यामुळे त्याने कम्प्युटरद्वारे परीक्षा दिली पेपर झाल्यानंतर त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement