BJP Mission Mumbai | 'मिशन मुंबई', भाजपची आज कार्यकारिणीची बैठक
शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने मिशन मुंबईची आखणी केली आहे. बिहारमध्ये सत्तेचं कमळ फुलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने मुंबई महापालिका सर करण्यासाठी रणनीती आखण्याचं निश्चित केलं आहे. आज संध्याकाळी वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांची उपस्थितीत असेल. या बैठकीत कोणती रणनीती ठरते याकडे शिवसेनेसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष असेल.