Kirit SOmaiya on COVID Center Scam : मुंबईत कोविड सेंटरचा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर,  विशेषतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेत.  मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.. वरळीतील कोविड सेंटरचं काम महापौरांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा आहे. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी स्थापन करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. तसंच मुंबईतल्या १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवण्याचं आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola