Mumbai BEST Bus: मुंबईत 24 तास बेस्ट बसची सेवा ABP Majha
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी अर्थात बेस्ट बसेस आता चोवीस तास धावणार आहे. रात्री लोकलची सेवा बंद झाल्यानंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन बेस्ट मुंबईकरांसाठी आधार ठरणार आहे. आजपासून बेस्ट रात्री १२ ते पहाटे पाचपर्यंत दर तासाने विशेष सेवा देणार आहे. हात दाखवा आणि बस थांबवा या तत्त्वावर या बसेस चालवल्या जातील. रात्री लोकल बंद झाल्यानंतर कामानिमित्त बाहेर असलेल्या प्रवाशांसाठी विशेषतः हॉस्पिटल, हॉटेल, विमानतळ अशा विविध ठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱयांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहतुकीचे कोणतेही साधन नसतं. त्यांची हीच गैरसोय लक्षात घेऊन आजपासून ठराविक मार्गांवर रात्री १२ ते पहाटे पाचपर्यंत बेस्टच्या विशेष बसेस धावणार आहेत.