Mumbai ArtExhibition:मानवी चेहरे कॅनव्हासवर उतरले,दीपाली देशपांडे-संजय घागरेंच्या चित्रांचं प्रदर्शन

Continues below advertisement

ऑलिम्पियन रायफल नेमबाज दीपाली देशपांडे आणि संजय घागरे यांनी साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन भायखळ्याच्या नाईन फिश आर्ट गॅलरीत भरलं आहे. सृष्टीनिर्मात्यानं हे जग घडवताना प्रत्येक भूप्रदेश आणि मानवी चेहऱ्यांमध्ये कमालीचं वैविध्य राखलं आहे. मानवी चेहऱ्यांमधल्या त्याच वैविध्याची संकल्पना घेऊन दीपाली देशपांडे आणि संजय घागरे यांनी आपली चित्रं साकारली आहेत. दीपालीची सारी चित्रं ही पोर्ट्रेट बाजातली आहेत, तर संजयनं अमूर्त शैलीत मानवी चेहरे कॅनव्हासवर उतरवले आहेत. ग्रेट ईस्टर्न मिल्समधल्या गॅलरीत हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत उद्याही सुरु राहणार आहे..... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram