Anil Deshmukh | ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनीच रेल्वे स्थानकावर यावं; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन
ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनीच रेल्वे स्थानकावर यावं असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलंय. काल वांद्रे स्थानकात परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळली होती. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी हे आवाहन केलंय. तसंच पोलिसांवर दबाव असल्याने त्यांच्या मदतीला मंत्रालयाचे कर्मचारी येणार आहेत. मुंबईतील ९३ पोलीस स्थानकात मंत्रालय कर्मचारी काम करणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय.