ABP News

Coronavirus | कोरोनाशी झुंजताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना सरकारकडून 50 लाख

Continues below advertisement
कोरोना प्रादूर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत व योग्य ती शासकीय नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकद्वारे संवाद साधताना स्पष्ट केले. कोरोनाशी झुंजताना दोन हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर व संदीप सुर्वे यांचे दुर्दैवी मृत्यू फारच दुःखदायक आहे. राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असं ट्विट गृहमंत्र्यांनी केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram