Lockdown | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
देशातील दुसऱ्या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आठवडा शिल्लक आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 एप्रिल) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसह बातचीत करतील. देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची ही तिसरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे.