Mumbai Rains | मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी; अनेक सखल भागांत पाणीच पाणी
मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. तर सोमवारी पहाटेपासून मुंबई उपनगरांतील विविध भागांत पावसाच्या सरी बसरत आहेत. गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
Tags :
Navi Mumbai Rain Update Heavy Rains In Mumbai Monsoon Update Mumbai Rains Mumbai Rain Update Thane Monsoon 2020 Mumbai