Mumbai Amitabh Bachchan: बीग बी यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई नाही ABP Majha

सर्वसामान्यांवर थेट कारवाई करणारी मुंबई महापालिका बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर मेहेरबान झालीय का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई करणार नाही असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने लोकायुक्तांच्या सुनावणीत दिलंय. रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिलंय. पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडुन पुढची कार्यवाही करु असं पालिकेनं म्हटलंय. काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी या संदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. पालिका २०१७पासून रस्ता रुंदीकरणासाठी बच्चन यांच्याकडून जमीन ताब्यात घेण्यात अपयशी ठरल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola