छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं ही अफवा,अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण
Continues below advertisement
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी समूहाला नुकताच मिळाला. हा ताबा मिळताच आठवड्याभरातच अदानी कंपनीचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलविण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले. मात्र अदानी समूहाने ट्वीट करत या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. "या अफवा असून मुख्यालय हे मुंबईमध्ये राहणार आहे," असे म्हणत चर्चांचे खंडण केले आहे.
मुंबई विमानतळाचं मुख्यालय गुजरातला स्थलांतरित करण्यावर अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण आले आहे. अदानी ग्रुपने ट्वीट करत म्हटले आहे की, "मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादकडे जाणार या अफवा आहेत. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाचं मुख्यालय या दोन्ही विमानतळाचे मुख्यालय मुंबईत राहणार आहे. विमानतळाद्वारे मुंबईला हजारो रोजगार उपलब्ध करुन देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."
Continues below advertisement