Mumbai Air Pollution :मुंबईची हवा धोक्याच्या पातळीवर,प्रदूषणाची हीच स्थिती आणखी तीन दिवस कायम राहणार
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्याची हवा बिघडलीये.. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चाललीये. काही दिवसांपुर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा येवून पोहोचलीये. जी स्थिती मुंबईत आहे तशीच काहीशी स्थिती इतर जिल्ह्यातही आहे. बिघडलेली ही हवा आरोग्यासाठी मात्र घातक ठरणारी आहे. दरम्यान रात्री प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने दारे खिडक्या बंद ठेवाव्यात. प्रदूषणाची हीच स्थिती आणखी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे...