Mumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी आहे. नालासोपारा पेल्हार फाटा ते विरारच्या खानिवडे टोल नाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी आहे. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रिटकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे मागील २ महिन्यापांसून वाहनचालकांना अशा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय.