Aarey Car shed | अहवाल बंधनकारक नाही, अभ्यास करुन निर्णय घेऊ : आदित्य ठाकरे | ABP Majha
मेट्रोचं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही, त्यामुळे आरेमध्येच मेट्रो कारशेडचं काम सुरु करावं अशी शिफारस 4 सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच या समितीची स्थापना केली होती. या समितीनं मुख्यमंत्र्यांना काल अहवाल सादर केला आहे. कारशेडच्या बांधकामावरची स्थगिती उठवण्याची शिफारसही या अहवालातून करण्यात आल्याची माहिती मिळतीय..