Mumbai : मुंबईतील पीएफ घोटाळ्याप्रकरणी सात जण निलंबित ABP Majha
मुंबईतल्या ईपीएफओ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. एबीपी माझानं १८ ऑगस्टला याविषयीचं वृत्त दाखवलं होतं. त्यानंतर कारवाईनं वेग धरलाय. देश कोरोना संकटात असताना सर्वसामान्यांच्या पीएफमधील २१ कोटींहून अधिक रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार अंतर्गत चौकशीत समोर आला होता. याप्रकरणी आधी ५ जणांचं निलंबन झालं होतं आणि आता आणखी दोघांना निलंबित करण्यात आलंय. या दोघांपैकी एक सहाय्यक आयुक्त पदावरील कर्मचारी असल्याचं कळतंय.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News EPFO ABP Majha Majha Effect ABP Majha Video PF Scam