Mum University Scam : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर, व्हिडीओ समोर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा धक्कादायक कारभार समोर आलाय. दूरस्त आणि अध्ययन शिक्षण संस्था अर्थात आयडॉलच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर आढळून आल्या आहेत. विद्यापीठाचा परीक्षा विभाग अत्यंत गोपनीय समजला जातो, त्याच विभागाच्या उत्तर पत्रिका बाहेर गेल्याच कशा असा सवाल विचारला जातोय. उत्तर पत्रिका अशा पद्धतीने बाहेर गेल्यामुळे उत्तर पत्रिकात छेडछाड होण्याची, त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातच कुलगुरूंनी, प्र कुलगुरूंनी लक्ष घालून आयडॉलच्या परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेनं केलीय.     

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola