Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये खडी टाकल्याने मनसे आक्रमक, मैदानात धरणं आंदोलन सुरु
मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात महापालिकेनं खडी टाकल्यानं मनसेनं तिथं धरणं आंदोलन सुरु केलंय. माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरु केलंय. शिवाजी पार्कमध्ये खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याचा आक्षेप मनसे आणि शिवाजी पार्क जवळच्या रहिवाशांनी घेतला आहे. यावरून शिवसेना आणि मनसेत शीत युद्ध सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही, असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. प्रत्यक्षात या खडीवर माती टाकण्यात येणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकण्यात येत असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलंय. पण मनसेनं त्याला आक्षेप घेतला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Shivajipark Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Shivajipark Mns Protest