सेव्हन हिल्स रुग्णालयात 200 हून अधिक रुग्णांवर पालिकेच्यावतीने उपचार, कॉकटेल अॅंटीबॉडीजचा प्रयोग
Continues below advertisement
कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या (एण्टीबॉडीज कॉकटेल) उपचार पद्धतीनं अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले असून हा प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरला आहे. कारण, हे मिश्रित औषध दिल्यानंतर फक्त एकाच (0.5 टक्के) रुग्णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्यू दरामध्ये तब्बल 70 टक्के घट झाली आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन कमी होवून आता 5 ते 6 दिवसांवर आला आहे.
Continues below advertisement